-->

Ads

पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!

कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली


Hardeepsingh Nijjar Killing : खलिस्तान चळवळीचे समर्थन करणाऱ्या हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमुळे जगभरात खळबळ माजली आहे. या हत्येमुळे कॅनडा आणि भारत यांच्यातील संबंध खराब होण्याची शक्यता आहे. कारण, हरदीपसिंगच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा दावा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. १३ सप्टेंबर रोजी त्यांनी संसदेत हा दावा केला. दरम्यान, हरदीपसिंग याच्या हत्येचा व्हिडीओ समोर आला आहे. वॉशिंग्टन पोस्टने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

अमेरिकास्थित वर्तमानपत्र वॉशिंग्टन पोस्टने घटनास्थळावरी ९० सेकंदाच्या व्हिडीओवरून या घटनेची हकीगत सांगितली आहे. कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर पार्किंग क्षेत्रात १८ जून रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली. यावेळी गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबाराचे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे. वॉशिंग्टन पोस्ट आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येत किमान सहा पुरुष आहेत.

हरदीपसिंग निज्जरची हत्या कशी झाली?

पार्किंगमध्ये निज्जरचा पिकअप ट्रक होता. तसंच, तिथे एक सेडान गाडी उभी होती. पिकअप ट्रक पार्किंगमधून बाहेर पडत असताना सेडान गाडी पिकअपच्या समांतर बाजूला आली. त्यानंतर, सेडान गाडी पिअकपला ओव्हरटेक करून पुढे गेली आणि पिकअपच्या समोर येऊन थांबली. यावेळी सेडान गाडीतून दोघेजण उतरले आणि पिकअप ट्रकच्या चालकावर त्यांनी बंदूक रोखली, असं या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असल्याचं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे.

निज्जरवर जवळपास ५० गोळ्या झाडण्यात आल्या. त्यापैकी ३४ गोळ्या त्याला लागल्या, अशी माहिती तपास यंत्रणांनी शिख समुदायातील लोकांना दिली. घटनास्थळ रक्तरंजित झाले होते. गाडीच्या काचा फुटल्या होत्या. जमिनीवर बंदुकीच्या गोळ्या पडल्या होत्या. यावेळी गुरुद्वारातील एक अधिकारी गुरुमीत सिंह तूर यांनी निज्जर याला पिकअप ट्रकमध्ये बसवून हल्लेखोरांचा पाठलाग केला.

तपास कोण करणार? पोलिसांमध्येच जुंपली

निज्जरच्या हत्येचा तपास कोण करणार, यावरून सरे पोलीस आणि आरसीएमपी पोलीस यांच्यात वाद झाला होता, असंही वृत्त वॉशिंग्टन पोस्टने दिले आहे. हत्येचा तपास करण्यावरून तासभर वाद सुरू होता. त्यामुळे पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला उशीर झाला असंही काही स्थानिकांनी म्हटलं आहे. दरम्यान, याप्रकरणी आरसीएमपी पोलिसांनी तपास करावा असे निर्देश सरे पोलिसांनी दिले.

 

Post a Comment

0 Comments