-->

Ads

बंजारा लोक संस्कृतीचे जतन करा -भाऊराव राठोड

"वडगाव रोड यवतमाळ येथे पस्तीस वर्षाची परंपरा लाभलेले भव्य तीज महोत्सव संपन्न.."

यवतमाळ प्रतिनिधी :सुरेश जाधव : तांडा संस्कृतीतून आधुनिक युगात नोकरी, शिक्षण व व्यवसायासाठी बंजारा समाज शहराकडे जरी मोठ्या प्रमाणात वळला असला तरी बंजारा संस्कृतीचे जतन करा असे आवाहन तांड्याचे नायक भाऊरावजी राठोड यांनी केले स्थानिक ( यवतमाळ)मागील ३५ वर्षाची परंपरा लाभलेला लाभलेला यवतमाळ शहरातील पहिला तांडा म्हणजे भाऊ नाईक तांडा. वडगाव रोड,यवतमाळ येथे यावर्षी मोठ्या प्रमाणावर तीच महोत्सवाचे १ सप्टेंबर ते १० सप्टेंबर पर्यंत आयोजन करण्यात आले होते. बंजारा लोकसंस्कृतीचे जतन करणारा तीच उत्सव हा श्रावणातील एक आनंदोत्सव. निसर्गप्रती प्रेम, आदरभाव व्यक्त करणारा कुमारिकांच्या जीवनात समृद्धी यावी यासाठी मनोभावे केलेली प्रार्थना म्हणजे तीचउत्सव 

या उत्सवाची सुरुवात तांडयाची नायकण श्रीमती पद्माताई राठोड कारभारीन सौ अनिताताई राठोड डायसाण संगीता ताई जाधव समाजसेविका अनुताई राठोड समाजसेविका सौ प्रज्ञाताई राठोड यांच्या उपस्थितीत तीज पेरण्याचा विधीवत कार्यक्रम झाला त्यानंतर आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यामध्ये 'ढंबोळी  पूजन 'निसर्गाच्या रूपाने पूर्वजांचे पूजन करण्याचा कार्यक्रम त्यानंतर 'बोरडीकार्यक्रम'  यामध्ये मुंगळ्यांनी तीच पेरणीसाठी काढून दिलेल्या शुद्ध मातीच्या प्रती दायित्व म्हणून भिजवलेले चणे बोरीच्या काट्याला लावणे व मुंगळ्यांना ते देणे असा विधिवत कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर दिनांक 9 सप्टेंबरला दहीहंडी, वेशभूषा एकल व  समुहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सोबतच राज्यस्तरीय तीज उत्सव सेल्फी स्पर्धा देखील घेण्यात आली. एकलनृत्य स्पर्धेमध्ये  अ गटात भूमी राठोड, लावण्या राठोड, शिवण्या आडे तर ब गटात रिंकल आडे, साक्षी राठोड, वैदही राठोड यांनी क्रमशः प्रथम द्वितीय व तृतीय पारितोषिक पटकावले.समूहनृत्य स्पर्धेत अ- गटात सामका ग्रुप च्या भाविका चव्हाण व चमू यांनी तर ब -गटात प्रथम जगदंबा ग्रुपच्या रिंकल आडे व चमू , व्दितीय धरमणी ग्रुपच्या रीना राठोड -चमू  व तर तृतीय क्रमांक नवयुती बंजारा मंडळाच्या सुजाता राठोड व चमू यांनी पटकावला. वेशभूषेत प्रथम क्रमांक ममता राठोड ,संजीवनी राठोड यांनी द्वितीय तर तृतीय सविता शेखर राठोड यांनी अ गटात प्रथम क्रमांक रुद्रांश पवन राठोड यांनी तर प्रोत्साहन पर अन्वीत चव्हाण,अंश जाधव, श्रीतेज चव्हाण, माहेश्वरी नाईक, यांनी बक्षिसे प्राप्त केली.

तीच विसर्जन व बक्षीस वितरण समारंभाचा कार्यक्रम वसंतराव नाईक शाळेच्या प्रांगणात वडगाव रोड येथे पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री भाऊरावजी राठोड नायक प्रमुख पाहुणे म्हणून तांड्याचे कारभारी श्री ज्ञानेश्वर चव्हाण डाव श्री सुधाकर जाधव माधुरीताई आडे (माजी जिल्हा परिषद अध्यक्षा )पूजाताई राठोड (बालसुधारगृह निरीक्षक) श्री यु.जी.राठोड श्री.पी.पी.पवार श्री विठ्ठल राठोड श्री.बी.जी पवार साहेब पी.आय.श्री.अजित राठोड, श्री.राजुदास जाधव, एपीआय पवन राठोड धुपचंद राठोड साहेब,डॉ.बळी राठोड डॉ. शितल चव्हाण डॉ.पुनम राठोड डॉ.निकिता चव्हाण डॉ. पूजा राठोड डॉ.भारती नाईक व प्रतिष्ठित मान्यवर मंडळी उपस्थित होती. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विविध स्पर्धांचे आयोजन महिला मंडळाच्या सौ. ज्योतीताई चव्हाण, सुनयनाताई राठोड, सौ प्रतिभाताई जाधव अश्विनीताई राठोड डॉ.निकिता चव्हाण टिनाताई जाधव ,सौ निर्मलाताई जाधव सौ.कल्पना ताई जाधव, सौ.सविताताई राठोड, आशाताई जाधव, कांताबाई चव्हाण,रवीभाऊ चव्हाण,अनिकेत आडे, महेश पवार,पवन राठोड, मिथुन जाधव दिलीप चव्हाण, अमोल राठोड, देविदास राठोड,शेखरभाउ राठोड, आसाराम चव्हाण,नितेश राठोड, राहुल आडे, अंबादास पवार, परीक्षित आडे, पंडित जाधव, बबलू चव्हाण, रंजीत चव्हाण, किशोर भाऊ सिताराम सचिन राठोड या युवकांनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.राजेश चव्हाण व ज्योती चव्हाण यांनी तर आभार रवीभाऊ चव्हाण यांनी मानले.



Post a Comment

0 Comments