रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे : श्री. गणेश तरुण मंडळ गणपती चौक आयोजित श्री सिद्ध गणेश महिला उद्दयोजिका पुरस्कार या वर्षी श्रीमती ज्योतीताई गजानन गिते यांना प्रदान करण्यात आला. श्री. गणेश तरुण मंडळाच्या वतीने प्रतीवर्षी समाजातील विविध महिला उद्धयोजिका आणि महिला सामाजिक कार्यकर्त्या यांचा गणेशोत्सव काळात सन्मान केला जातो.
श्रीमती ज्योतीताई गिते या सुमारे वीस- बावीस वर्षांपासून हॉटेल व्यवसायातून आपला उदरनिर्वाह करतात, एक महिला या व्यवसायामध्ये आपल्या स्वकर्तृतवाने उत्कृष्ट काम करत आहे. श्री केदार मेढी गुरुजींनी श्रीमती ज्योतीताईना मंत्र उच्चराने शुभेच्छा दिल्या. सौ. हेमा मनीष खोल्लम यांनी शाल आणि मानपत्र दिले.सौ. सारिका अवधूत कुलकर्णी यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी श्रीमती ज्योतिताईंनी श्री गणेश तरुण मंडळाच्या या उपक्रमाचे खूप कौतुक केले. आणि मंडळाच्या भावी करायला शुभेच्छा दिल्या.
श्रीमती ज्योतीताईचे दीर श्री अविनाश गिते यांनी सुद्धा मंडळाच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी सौ. हेमा खोल्लम यांनी प्रतीवर्षी महिला उद्धयोजिका पुरस्कार देण्याचा संकल्प केला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अवधूत कुलकर्णी,अनिल कुंटे, मिलिंद मेढी, शीतल वाघमारे, ऋतुजा पुंडले, भूपेन खोल्लम, समृद्धी जोशी, दिया निगडकर, प्रशांत खर्डेकर, श्रावण थिठे, निशा राजे, समीरा इनामदार, पराग पुसाळकर, शैलेश धर्माधिकारी आदी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.
मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिल फाकटकर व उत्सव प्रमुख स्वप्नील गुप्ते यांनी सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले.
0 Comments