-->

Ads

मराठा साम्राज्यातील राजे व सरदार घराण्यातील वंशजांनी श्रीमंत छत्रपती घराण्याच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या ' हिंदवी स्वराज्य महासंघ ' या अखिल भारतीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा

 रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे:मराठा साम्राज्यातील राजे व सरदार घराण्यातील वंशजांनी श्रीमंत छत्रपती घराण्याच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या ' हिंदवी स्वराज्य महासंघ ' या अखिल भारतीय संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व पुढील २०२३- २७


सालासाठीच्या प्रधान मंडळाची निवडणूक पुणे येथे संपन्न झाली.  श्रीमंत शिवाजीराजे भोसले (तंजावर घराणे) यांचे मार्गदर्शनाखाली व श्रीमंत सुचेतादेवी पेशवा व श्री विक्रमसिंह मोहिते यांचे उपस्थितीत सभा होऊन त्यात प्रधान मंडळातील विविध पदांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली.  देशासाठी एकत्र येऊन छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्य व स्वराज्य विस्तारासाठी लढलेल्या घराण्यांचे हे संघटन आहे. निवडून आलेल्या पदांवर वरिष्ठ उपाध्यक्ष रणजीत नातु ( सरदार नातु घराणे), उपाध्यक्ष (६पदे)- सर्वश्री: अमरजितराजे बारगळ जहागीरदार ( तळोदे संस्थान), निलराजे पं. बावडेकर (अमात्य घराणे कोल्हापूर), माणिकराव बावणे सरकार (नाईक बावणे सरदार, उदगीर), डाॅ. नारायण विंचुरकर ( सरदार विठ्ठल शिवदेव घराणे, नाशिक), शिरीषराव चिटणीस ( खंडो बल्लाळ घराणे, सातारा) तर महामंत्री म्हणून ज्येष्ठ माध्यमतज्ञ  योगेश्वर गंधे (सरदार अंताजी माणकेश्वर गंधे घराणे, अहमदनगर) यांची निवड करण्यात आली.  सहमंत्री म्हणून  रविन्द्र कंक (सरदार येसाजी कंक घराणे) व  समीरराव पोतनीस (सरदार मुरारबाजी घराणे) , कोषाध्यक्षपदी ॲड्. अशोकराव पलांडे (सरदार पलांडे घराणे, शिरूर)हे असून मंडळ सदस्यपदी सर्वश्री- विक्रमसिंह मोहिते,  सत्यशिलराजे दाभाडे (तळेगाव दाभाडे संस्थान), कैलाश मेहेंदळे (सरदार गणपतराव घराणे), रणजितसिंह गरूड ( गरूड देशमुख घराणे, ग्वाल्हेर), रेहान सरदार (इब्राहिमखान गारदी घराणे, हैद्राबाद), समरजितसिंह जाधवराव ( देवास ज्यु. म.प्र. ), श्रीमती वासंती पुरोहित ( सरदार रेठरेकर घराणे) व प्रा. रूपाली देशपांडे (वीररत्न बाजीप्रभू घराणे, सिंद) यांचा समावेश आहे. 
      

संस्थेचे अध्यक्षपद हे छत्रपती घराण्याकडे तर कार्याध्यक्षपद हे पेशवा घराण्याकडे मानाने दिले जाते.  स्वराज्य शपथ दिवस, पानिपत शौर्य दिवस, अटक विजय दिवस व दक्षिण दिग्विजय दिन हे इतिहासातील दुर्लक्षीत पण महत्वाचे दिवसांचे कार्यक्रम व  ऐतिहासिक वाडे, गढी, दस्तावेज, वारसा जतन करणे आदि उपक्रम हिंदवी स्वराज्य महासंघातर्फे भारतभर राबवले जातात. अशी माहिती महामंत्री  योगेश्वर गंधे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments