-->

Ads

माझी माती माझा देश मोहिमेअंतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत भव्य अमृत कलश यात्रा.


 रेखा भेगडे: तळेगाव दाभाडे : आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम हाती घेतले होते. या अनुषंगाने अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाबाबत शासनामार्फत प्राप्त विविध मार्गदर्शक सूचनानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरोंको वंदना )अभियान राबविण्यात आले असून या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शिलाफलक अनावरण, स्वातंत्रसैनिकांचा सन्मान, ध्वजारोहण, पंचप्रण शपथ, हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. 




प्रत्येक राज्यामध्ये गाव ते शहरापर्यंत आपल्या मातीविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शहरात अमृत कलश यात्रा काढणेबाबत सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यास अनुसरून दिनांक 19/9/2023 ते 20/9/23 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेमार्फत भव्य अमृत कलश यात्रा काढण्यात आली.

ही अमृत कलश यात्रा तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालय, मारुती चौक येथून सुरु होऊन पुढे मारुती मंदिर चौक, जिजामाता चौक, राजेंद्र चौक, मारुती मंदिर चौक या मार्गाने पुन्हा नगरपरिषद कार्यालय येथे आली. यावेळी नागरिकांच्या घराघरातून तांदूळ व माती संकलन करण्यात आली. त्याचबरोबर देशभक्तीपर घोषणा देत ही यात्रा काढण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांना मुख्याधिकारी एन. के. पाटील तसेच उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा काढण्यात आली. या उपक्रमासाठी नगरपरिषदेचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते. तसेच नगरपरिषद माध्यमिक शाळा क्रमांक 2 चे सर्व विध्यार्थी व शिक्षक त्याचबरोबर थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळेचे विध्यार्थी व शिक्षक त्याचबरोबर नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

0 Comments