-->

Ads

युवा उद्योजक रणजीत काकडे यांना उध्दव श्री पुरस्कार प्रदान तळेगाव दाभाडे:शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तळेगाव दाभाडे येथील युवा उद्योजक,आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडचे संचालक

  रेखा भेगडे :रणजीत काकडे यांना 'उद्धव श्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला.संत तुकारामनगर पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात झालेल्या या कार्यक्रमात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, ज्येष्ठ विचारवंत श्रीपाल सबनीस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते काकडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 


यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख दिलीप घोडेकर,महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,शैला खंडागळे,अनिता तुतारे,विधानसभा प्रमुख अनंता कोऱ्हाळे,धनंजय आल्हाट,तुषार नवले,संयोजक गुलाब गरुड, युवराज कोकाटे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 'राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती' योजनेच्या लाभधारकांना धनादेश वाटपाचा सोहळा सुषमा अंधारे यांच्या हस्ते पार पडला. रणजित काकडे हे आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेडचे संचालक तसेच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे संचालक असून  पुणे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने कामाचा वेगळा ठसा उमटविणारे ते युवा उद्योजक आहेत. रणजीत काकडे हे उत्कृष्ट संघटक म्हणून ओळखले जातात.आपले वडील , प्रसिद्ध उद्योजक रामदास आप्पा काकडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून उद्योग विश्वाचे धडे गिरवत रणजित काकडे यांनी उद्योग विश्वाचा राजमार्ग स्वकष्टाने निर्माण केला आहे.

Post a Comment

0 Comments