-->

Ads

भारतीय राज्यव्यवस्थेसाठी मोठा दिवस; नव्या संसदभवनात आजपासून कामकाजाला सुरुवात होणार

संसद संसदेच्या अधिवेशनाचा आज दुसरा दिवस; नव्या संसदभवनात कामकाजाला सुरुवात होणार, आज 4 महत्वपूर्ण विधेयकं मांडली जाणार आहेत. खासदारांचं फोटोसशन केलं गेलं. वाचा सविस्तर...


नव्या संसदभवनात आज मांडली जाणारी विधेयक

नव्या संसदभवनात आजपासून कामकाजाला सुरुवात होणार आहे. या नव्या संसदेतील कामकाजाच्या पहिल्या दिवशी काही महत्वाची विधेयकं मांडली जाणार आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. अधिवक्ता (दुरूस्ती) विधेयक आज मांडलं जाईल. द प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पीरियडिकल बील, पोस्ट ऑफिस बिल 2023 यावरही चर्चा होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक आयुक्तांबाबतही चर्चा होणार आहे. या आयुक्तांची नियुक्ती, सेवेच्या अटी, कार्यकाल यावर चर्चा होईल.

जुन्या संसद इमारतीत मोदींचं शेवटचं भाषण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल या जुन्या संसद भवनात शेवटचं भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक आठवणी जागवल्या. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कारकीर्दीपासून ते आतापर्यंतच्या देशाच्या वाटचालीवर शेवटचं भाषण केलं.

जुन्या संसदभवनात खासदारांचं फोटोसेशन

जुन्या संसदभवनात आता आजपासून कामकाज होणार नाही. नव्या संसदभवनात या कामकाजाला सुरुवात होणार आहे. त्याआधी सर्व खासदारांनी एकत्र येत फोटोसेशन केलं. यावेळी सर्व पक्षांचे खासदार उपस्थित होते. संसदेचे सदस्य असणाऱ्या खासदारांना फोटोसेशन झाल्यानंतर खासदारांना कीटचं वाटप केलं जाणार आहे. या किटमध्ये संविधानाची प्रत असणार आहे. नव्या संसदेच्या स्मारकाचं नाणं आणि एक पोस्ट तिकीट असणार आहे. सेंट्रल हॉलमधील कार्यक्रमानंतर हे किट लोकसभा आणि राज्यसभा खासदारांना दिलं जाणार आहे.






Post a Comment

0 Comments