-->

Ads

सिलिंडर लीक करुन अपघाताचा बनाव, शेजारचे धावल्यानं प्रयत्न फसला; मायलेकासोबत काय घडलं?

सिलिंडरमधून वायू गळती झाल्याचा संशय शेजाऱ्यांना आला. काही वेळातच परिसरात उग्र दर्प पसरला. त्यामुळे शेजारी मायलेक राहत असलेल्या घराकडे धावले. पण दार उघडत नव्हतं.

बंगळुरू: महिला आणि तिच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे आधी महिलेशी प्रेमसंबंध होते. शेखर (३८) असं आरोपीचं नाव असून तो पेशानं इलेक्ट्रिशियन आहे. कुवेंपुनगरचा रहिवासी असलेल्या शेखरनं नवनीथा (३५) आणि तिचा मुलगा सृजन (८) यांची गळा कापून हत्या केली. बंगळुरू पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या रविंद्रनाथ गुड्डे परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडामुळे एकच खळबळ उडाली होती.


मायलेकांची हत्या केल्यानंतर शेखरनं घरातील गॅस स्टोव्ह पेटवला. घर बाहेरुन बंद केलं आणि तिथून पळून गेला. नवनीथा एका बीपीओ कंपनीत कामाला होती. पती चंद्रूपासून ती वेगळी राहत होती. शेजाऱ्यांनी मायलेकांचे मृतदेह पाहिले आणि याची माहिती पोलिसांना दिली. 'शेजाऱ्यांना सिलिंडर लीक झाल्याचा संशय आला. त्यांनी नवनीथा यांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण बराच वेळ दार वाजवूनही नवनीथानं कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकी उघडली, तेव्हा त्यांना मायलेकांचे मृतदेह दिसले. त्यानंतर त्यांनी तातडीनं दार उघडलं,' अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

चंद्रूपासून वेगळी झाल्यानंतर नवनीथाचे शेखरसोबत प्रेमसंबंध होते. दोघे दोन वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. नवनीथाचे आणखी एका व्यक्तीशी प्रेमसंबंध असल्याची माहिती शेखरला नुकतीच समजली होती. त्यावरुन तो सतत नवनीथासोबत वाद घालायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी नवनीथाच्या आईनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. सुरुवातीला पोलिसांना चंद्रवर संशय होता. त्यांना त्याला ताब्यात घेऊन चौकशीदेखील केली. पण या हत्या प्रकरणात त्याचा हात नसल्याचं चौकशी आणि तपासातून समोर आलं.



Post a Comment

0 Comments