-->

Ads

श्री गणेश तरुण मंडळ तळेगाव तर्फे आयोजित लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती विद्या मंदिर प्राथमिक विभागाने (तळेगाव दाभाडे) सुयश मिळविले

रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे :सरस्वती विद्यामंदिर तळेगाव दाभाडे विविध स्पर्धेत सुयश मिळवत असतेच यावर्षी ही गणेश तरुण मंडळ तळेगाव दाभाडे  तर्फे आयोजित लोकनृत्य स्पर्धेत इ.१ली ते ४थी

च्या गटात प्राथमिक विभागाने प्रथम क्रमांक मिळवला .२५००रू. रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या लोकनृत्याला सौ.तृप्ती भास्कर व सौ.अनिता कुंभार यांनी मार्गदर्शन  केले. तसेच इ.५ वी ७वी च्या गटाने द्वितीय क्रमांक मिळवला.२५००रू. रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप होते.



या लोकनृत्याला सौ.सोनल शेटे व सौ.प्रतिभा देवकर यांनी मार्गदर्शन केले.या  सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सुरेश झेंड उपाध्यक्ष मा. श्री दिलीप कुलकर्णी , प्राथमिक शिक्षण समिती सदस्य डॉ. ज्योतीताई चोळकर , सदस्य  मा.श्री विश्वास देशपांडे व सर्व पदाधिकारी ,मुख्याध्यापक  श्री नवनाथ गाढवे सर यांनी  अभिनंदन व  कौतुक केले.




 

Post a Comment

0 Comments