परस्पर वादातून महिलेने तिच्या नातेवाईक महिलेला मारहाण केली . एवढेच नव्हे तर क्रूरतेच्या सर्व सीमा पार करत तिने तिचा अनन्वित छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
जयपूर | 19 सप्टेंबर 2023 : दिवसेंदिवस गुन्ह्याच्या घटना वाढतच असून काही गुन्ह्यांमध्ये क्रूरतेच्या (crime news) सर्व सीमा पार केल्या जातात. राजस्थानमधून अशीच एक क्रूर, हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. तेथे एका भावजयीने तिच्या वहिनीला अमानवी वागणूक देत क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. परस्पर वादातून मोठी वहिनी ही तिचीच नातेवाईक असलेल्या महिलेच्या घरात घुसली. तिचे हात बांधून मारहाण (beat up woman) केली. मात्र ती एवढ्यावरच थांबली नाही तर नंतर तिने त्या महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये थेट मिरचीची पूडच टाकली. धक्कादायक गोष्ट म्हणजे या संपूर्ण प्रकारात त्या महिलेच्या मुलानेही तिला साथ दिली.
हे संपूर्ण प्रकरण राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील बोरानाडा ठाणे क्षेत्रातील आहे. तेथे नारनाडी येथे एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह राहते. तिचा पती कामानिमित्त गोव्यात असतो. तर महिलेची मोठी जाऊन तिच्या घरापासून काही अंतरावरच राहते. काही वैयक्तिक कारणामुळे त्या दोघींमध्ये बऱ्याच दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी संध्याकाळी पीडित महिला तिच्या घरात एकटीच होती. हीच संधी साधून तिची मोठी जाऊ तिच्या मुलासह पीडितेच्या घरात शिरली. तिच्याशी पुन्हा वाद घालू लागली.
वाद वाढल्यानंतर आरोपी महिलेने तिने मुलासोबत मिळून त्या महिलेचे हात घट्ट बांधून टाकले. नंतर त्या दोघांनीही मिळून पीडित महिलेला बेदम मारहाण केली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाल तिखट टाकले. यामुळे ती महिलेला पराकोटीच्या वेदना होऊ लागल्या, ती तडफडू लागली. मात्र एवढं करूनही त्या आरोपी महिलेचं मन भरलं नाही. तिने घरातली एक प्लास्टिकची पिशवी पेटवून त्याच्या सहाय्याने त्या महिलेच्या अंगावर चटके दिले. या क्रूरतेमुळे त्या महिलेच्या अंगावर मोठमोठे फोडही आले. ती वेदनेने किंचाळू लागली. तिचा आवाज ऐकून शेजार-पाजारचे लोक , नातेवाईक तिथे धावत आले आणि त्यांनी कशीबशी त्या महिलेची सुटका करत तिला उपचारांसाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. पोलिसांना या सर्व घटनेची माहिती देण्यात आली.
त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून या क्रूर घटनेप्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून महिलेचा जबाबही नोंदवण्यात आला . या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत. महिलेला सध्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
0 Comments