सध्या कपडे धुण्याचा साबण खाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
Viral Video : सोशल मीडियावर अनेक थक्क करणारे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ आश्चर्यचकित करणारे असतात. सध्या कपडे धुण्याचा साबण खाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
काही लोकं स्वत:ला खरं सिद्ध करण्यासाठी वाट्टेल ते करतात. अशाच एका चिनी कंपनीच्या चेअरमनने कपडे धुण्याचा साबण नॅचरल आहे आणि त्यापासून कोणताही धोका नाही, हे सिद्ध करण्यासाठी चक्क सर्वांसमोर साबण खाल्ला. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही, पण हे खरंय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की, कंपनीचे चेअरमन त्यांच्या नव्या कपडे धुण्याच्या साबणाविषयी माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीओत ते सांगण्याचा प्रयत्न करतात की, हा साबण अजिबात केमिकलयुक्त नाही आणि यात फक्त एलकली,
अॅनिमल फॅट आणि दूध आहेत.
आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी हे चेअरमन चक्क बिस्किटांसारखा साबण खायला सुरुवात करतात. चेअरमनच्या मते हा साबण इतका नॅचरल आहे की, पोटात गेल्यानंतर या साबणाचे फॅट्स आणि तेलामध्ये रुपांतर होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
purvanchal51 या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही युजर्सनी या व्हिडीओवर जोरदार टीकासुद्धा केली आहे.
0 Comments