अमोल रमेश काकडे (३२, रा. पळसखेड) असे मृताचे नाव आहे.
अमरावती: अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीची पत्नीने आपल्या वडिलांच्या मदतीने गळा आवळून हत्या केली. ही घटना चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पळसखेड येथे उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी मृताची पत्नी आणि सासऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.
अमोल रमेश काकडे (३२, रा. पळसखेड) असे मृताचे नाव आहे. अमोलची ३० वर्षीय पत्नी आणि सासरे भगवंत सहदेव राऊत (६०) दोघेही रा. पळसखेड, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी प्रफुल्ल रमेश काकडे (३०, रा. अमरावती) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल यांच्या पत्नीचे एका परपुरुषासोबत अनैतिक संबंध होते. याबाबत अमोलला माहिती मिळाली. या कारणावरून अमोल व त्यांच्या पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे.
0 Comments