Pune News: पुणे जिल्ह्यातील दौंड येथील एका निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यानमहिलेशी जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवून लाखो रुपये उकळल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर
दौंड: निवृत्त पोलिस कर्मचाऱ्याने महिलेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले आणि वेळोवेळी तिच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी निवृत्त पोलिस कर्मचाऱ्यासह त्याच्या कुटुंबावर यवत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनीष बिलोन ठाकूर (वय ५४), हन्ना मनीष ठाकूर, संदेश मनीष ठाकूर, श्वेता मनीष ठाकूर (सर्व रा. डिफेन्स कॉलनी, दौंड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मनीष ठाकूरला यवत पोलिसांनी अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.
आरोपी मनीष ठाकूर हा स्वतः मोठा पोलिस अधिकारी आहे, असे पीडित महिलेला सांगत होता. त्यामुळे तिने बरेच दिवस भीतीपोटी तक्रार दाखल केली नाही. शेवटी मानसिक त्रास न सहन झाल्याने तिने यवत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार केली. मनीष ठाकूर याने यवत परिसर व दौंड तालुक्यात कोणाची धमकी देऊन फसवणूक केली असेल, तर त्यांनी यवत पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले आहे.
0 Comments