-->

Ads

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री. रविंद्र आप्पा भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहुरोड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक

भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा.श्री. रविंद्र आप्पा भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहुरोड शहरातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान यावर मार्गदर्शन केले.!


रेखा भेगडे : तळेगाव दाभाडे : भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख मा. श्री. रवींद्र आप्पा भेगडे यांनी सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत देहूरोड शहरातील भारतीय जनता पार्टी च्या सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बूथ सशक्तीकरण अभियान यावर मार्गदर्शन केले.

तसेच शहराचे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.श्री.लाहूमामा शेलार यांचे भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभेच्या वतीने अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या..! 


त्याचप्रमाणे देहूरोड शहरातील सर्व बूथच्या कार्य समित्या व बूथ कमिटी यादी पूर्ण करून सर्वांनी जास्तीत जास्त सरल ॲप डाऊनलोड करून मोदी साहेबांच्या जनकल्याणकारी योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून पुन्हा एकदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी आजपासून कामाला लागावे अशा सूचना केल्या.! 




याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस डॉ.श्री.ताराचंद कराळे, जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामदास भाऊ गाडे,नवनिर्वाचित शहराध्यक्ष श्री. लहुमामा शेलार, जेष्ठ नेते श्री. गुरुमीत सिंग रतू, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष श्री.कैलास आण्णा पानसरे, मा.उपाध्यक्ष श्री.रघुवीर दादा शेलार, देहूरोड शहराचे मा.अध्यक्ष श्री.बाळासाहेब शेलार यांच्यासह देहूरोड शहरातील सर्व प्रमुख पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष , महिला भगिनी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..!

Post a Comment

0 Comments