-->

Ads

पुणे मेट्रो समोरासमोर, व्हिडिओ व्हायरलनंतर मेट्रोकडून स्पष्टीकरण, हा प्रकार…

Pune Metro News : पुणे मेट्रो सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पुणे मेट्रोचे दोन मार्ग सुरु होऊन आता महिनाभर झाला आहे. या मार्गांवर प्रवाशांची संख्या वाढली आहे. नुकताच पुणे मेट्रोतील एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. त्यासंदर्भात मेट्रोने खुलासा केला आहे.


पुणे | 8 सप्टेंबर 2023 : पुणे शहरात दोन नवीन मार्गावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर मेट्रो सुरु झाली. सिव्हिल कोर्ट ते पिंपरी चिंचवड आणि गरवारे कॉलेज स्टेशन ते रूबी हॉल या मार्गांवर मेट्रो धावत आहेत. या मेट्रोला पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी आपल्या वैयक्तीक वाहनाऐवजी मेट्रोने प्रवास सुरु केला आहे. नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे ऑगस्ट महिन्यात मेट्रोला 3 कोटी 7 लाख 66 हजार 481 रुपयांचे उत्पन्न मिळाले. परंतु आता मेट्रो संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

काय आहे व्हिडिओ

पुणे मेट्रोचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ निलेश निकम यांच्या X (पूर्वीचे टि्वटर) अकाउंटवरून व्हायरल झाला आहे. यामध्ये तो रेंज हिल डेपोमध्ये ट्रॅकच्या खाली उभे राहून दोन्ही मेट्रो एकच ट्रॅकवर समोरासमोर आल्याचे सांगत आहे. यामध्ये निलेश निकम मेट्रोचा भोंगळ कारभार असल्याचा दावा करत आहे. तसेच मेट्रो प्रशासनला कळवूनही अधिकारी आले नसल्याचे सांगत आहे.



Post a Comment

0 Comments