सध्या तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सिद्धार्थ जाधवने नुकतंच अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा फोटो शेअर केला आहे. सध्या तो फोटो चांगलाच व्हायरल होत आहे.
मराठी कलाकारांचा ‘कलावंत’ नावाचा ढोल ताशा पथक आहे. या पथकात सर्व मराठी कलाकार सहभागी होत असतात. यंदाही अनेक मराठी कलाकारांनी ढोल वादनाचा आनंद लुटला. या ढोल वादनावेळी सिद्धार्थ जाधवने उत्साह संचारला होता. त्याचे अनेक व्हिडीओही व्हायरल झाले.
आता सिद्धार्थ जाधवने ढोल वादन संपल्यानंतरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तेजस्विनी पंडित आणि सिद्धार्थ जाधव पाहायला मिळत आहे. यावेळी तेजस्विनी ही झोपली आहे. तर सिद्धार्थही थकलेला असल्याचे दिसत आहे. “ढोल वादन संपल्यानंतरचे आमचे Super energetic चेहरे”, असे कॅप्शन सिद्धार्थ जाधवने दिले आहे.
0 Comments