-->

Ads

चेंबूर-संताक्रूज उड्डाणपुलावर तीन वाहनांचा भीषण अपघात; तिघे जखमी

चेंबूर-संताक्रूज उड्डाणपुलावर रविवारी पहाटे ओलाची मोटारगाडी, टॅक्सी आणि रिक्षा या तीन वाहनांचा अपघात झाला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले.




मुंबई : चेंबूर-संताक्रूज उड्डाणपुलावर रविवारी पहाटे ओलाची मोटारगाडी, टॅक्सी आणि रिक्षा या तीन वाहनांचा अपघात झाला. त्यात तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी पहाटे पाचच्या सुमारास लोकमान्य टिळक टर्मिनस जवळ असलेल्या उड्डाणपुलावर ही घटना घडली. ओलाची गाडी चेंबूर येथून कुर्ला पश्चिम परिसरात भरधाव वेगात जात होती. यावेळी उड्डाणपुलावरील सिग्नलवर अचानक समोर एक रिक्षा आली. त्यामुळे रिक्षाला धडक देऊन मोटारगाडी रस्त्यावरून जाणाऱ्या एका टॅक्सीवर जाऊन आदळली.

या अपघातात रिक्षासह, टॅक्सी आणि मोटारीचे नुकसान झाले आहे. तर यामध्ये रिक्षा चालक, टॅक्सी चालक आणि टॅक्सीमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या सर्वांना बाहेर काढले. त्यानंतर रुग्णवाहिकेतून या सर्वांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ओला मोटारीच्या चालकाने अपघातानंतर पळ काढला असून नेहरूनगर पोलिसांनी घटनेची नोंद करत तपास सुरू केला आहे.


 

Post a Comment

0 Comments