-->

Ads

नवऱ्याला दारु आणायला पाठवलं, विवाहितेवर दोघांचा सामूहिक अत्याचार, डोंबिवलीत खळबळ

Dombivli Crime : महिला एकटीच घरी होती, याचा फायदा घेत दिनेश गडारी याने महिलेवर अत्याचार केला. नराधमाच्या तावडीतून सुटून घराबाहेर मदतीसाठी ती पळू लागली



डोंबिवली : महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्यासाठी पाठवून दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. विष्णूनगर पोलिसानी दोघांपैकी एक आरोपी दिनेश याला अटक केली आहे, तर दिनेशचा साथीदार सुनिल याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेत पीडित महिला आपल्या नवऱ्यासोबत राहते. काही कारणामुळे तिने राहते घर सोडण्याच्या तयारी केली आणि तिने तिचे सामन तिच्या ओळखीच्या असलेल्या दिनेश गडारी याच्या घरी ठेवले होते.

१७ सप्टेंबरच्या संध्याकाळी ती महिला आणि तिचा नवरा हे सामान घेण्यासाठी गेले असता या दोघांचा मित्र दिनेश आणि त्याचा साथीदार सुनिल हे दोघे घरी होते. या दोघांनी त्या महिलेच्या नवऱ्याला दारु आणण्याकरीता सांगितले आणि तो दारु आण्यासाठी तिथून निघून गेला.

दरम्यान ती एकटीच घरी होती, याचा फायदा घेत दिनेश गडारी याने महिलेवर अत्याचार केला. दरम्यान या नराधमांच्या तावडीतून सुटून घराबाहेर मदतीसाठी सदर महिला घराबाहेर निघून पळू लागली. तिचा पाठलाग करुन दिनेश याचा मित्र सनिल याने तिला एका रिक्षात कोंबून रिक्षात तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडितेने विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

विष्णूनगर पोलिसांनी एसीपी सुनिल कुऱ्हाडे, वरिष्ठ पेलिस निरिक्षक मोहन खांदारे आणि महिला पोलिस अधिकारी मेघा वर्मा यांच्या मार्ग दर्शनाखाली तपास सुरु झाला.याप्रकरणी पोलिसांनी दिनेश याला अटक केली आहे. तर त्याचा मित्र सुनिल अटक करण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहेत.पोलिसांनी आज दिनेश याला कोर्टात हजर केले, यावेळी कोर्टाने दिनेशला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.



Post a Comment

0 Comments