-->

Ads

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचा सक्रिय सहभाग

 प्रतिनिधी :रेखा भेगडे: तळेगाव दाभाडे :स्वच्छ अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनामार्फत दि.17 सप्टेंबर 2023 ते 2ऑक्टोबर 2023 या कालावधीत इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेचे आयोजन केलेले असून त्यामध्ये नगर परिषद तळेगाव दाभाडे तर्फे सक्रिय सहभाग नोंदविण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने तळेगाव दाभाडे शहर स्वच्छ करण्यासाठी तळेगाव दाभाडे स्वच्छता वारियार्स टीम तयार करण्यात आली असून स्वच्छता पंधरवडा अंतर्गत नागरिकांना जास्तीत जास्त सहभागी करून त्यांच्या श्रमदानातून शहरातील महत्वाच्या सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करण्यात येत आहे. यामध्ये सर्व कार्यालयीन कर्मचारी, न. प. शाळामधील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी तसेच तळेगाव दाभाडे शहरातील सर्व शाळा महाविद्यालये, कार्यालये, खाजगी संस्था /आस्थापणे, क्रीडा समूह संघटना, बचत गट सदस्य, व शहरातील सर्व नागरिक इत्यादीचा जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग आवश्यक आहे. नागरिकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळवण्यासाठी जनजागृती करण्याच्या उद्धेशाने दि.18/09/2023 रोजी सकाळी 11 वाजता इंडियन स्वच्छता लीग अभियान जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रभात फेरी दरम्यान तळेगाव दाभाडे नगरपरिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 6मधील विध्यार्थ्यानी प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे च्या घोषणा दिल्या सोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत देखील घोषणा दिल्या. तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषद माध्यमिक विद्यालय शाळा क्रमांक 6व तळेगाव दाभाडे नगर परिषद प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 6 यातील सर्व विध्यार्थ्यांना वसुंधरा संवर्धनाबाबत व स्वच्छतेबाबत शपथ ही देण्यात आली.


मा. मुख्याधिकारी N. K.Patil. यांच्या मार्गदर्शनाखाली थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे प्राथमिक शाळा क्रमांक 1 व  2, तळेगाव दाभाडे नगर परिषद माध्यमिक शाळा क्रमांक 2, व सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक क्रमांक 6 येथे माझी वसुंधरा 4.0 पर्यावरण पूरक गणेशोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यात श्री. विजय जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली विध्यार्थ्यानी शाडू्मातीपासून गणपती बनवण्याचा आनंद घेतला.

Post a Comment

0 Comments