-->

Ads

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचे पाणी वापराबाबत जनतेसाठी मार्गदर्शक सूचना

 



रेखा भेगडे :तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यक्षेत्रात 2 नदीतून (पवना व इंद्रायणी नदी )पाणी उपसा केला जातो. उपसा केलेले पाणी हे पुरेश्या प्रमाणात उपलब्ध होत आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी नगरपरिषडेकडून पाणीपुरवठा पुरेशा प्रमाणात होत नसलेबाबत वेळोवेळी नागरिकांच्या तक्रारी प्राप्त होतात. त्यानुसार बहुतांश ठिकाणी विभागातील अधिनस्त कर्मचाऱ्यांकडून स्थळ पाहणी करण्यात येते. यादरम्यान अपुरा पाणीपुरवठा होत असल्यास कारणीभूत ठरणाऱ्या बाबींवर प्रशासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येते. त्याअनुषंगाने याद्वारे समस्त नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते कि, त्यांनी नगरपरिषदे तर्फे पाणीपुरवठा होत असताना प्रत्यक्ष नळाला मोटर लावून त्यांची सोसायटीवरील /टेरेसवरील पाण्याची टाकी भरू नये आधी नागरिकांनी प्रत्यक्ष नलास मोटर न लावता पाणी साठवून ठेवावे व गरज असल्यास नंतर ते पंपच्या सहाय्याने छतावरील टाकी भरण्यास वापरावे आणि शक्य असल्यास ओव्हर फ्लो वॉटर सेन्सर चा वापर करून पाण्याचा होणारा अपव्यय टाळावा. जेणेकरून सर्व नागरिकांना समसमान पाण्याचे वितरण करता येईल व बऱ्याच अंशी पाणी टंचाई देखील कमी होईल. जी घरे बंद अवस्थेत आहेत तसेच जे नळ तोट्याहीन असून पाणी वाया जात आहे अश्या मालमत्ता संदर्भात नगरपरिषदेश त्वरित कळवावे. तळेगाव दाभाडे शहरास महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र सुवर्णजयंती नागरोत्थन महाभियान (nagri) या योजनेतर्गत वाढीव पाणीपुरवठा करणेचे काम मंजूर असून सदर योजना पूर्णतःवाचे काम हे युद्धापातळीवर सुरु आहे. तत्सम योजने अंतर्गत शहरास अतिरिक्त पाणी पुरवठा होणार आहे. परंतु नागरिकांनी वरील विषद बाबींची दक्षता न घेतल्यास पूर्ववत आणि नविनतम योजना असून देखील भविष्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. एन. के. पाटील तसेच प्रभारी पाणीपुरवठा, स्वच्छता व जलनिस्सारन अभियंता श्रीमती अमृता घारे यांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत वारंवार होणारी पाणी समस्या टाळण्यासाठी नागरिकांना पाणी वापराबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहे. तसेच त्या सूचनांचे पालन नागरिकांनी करावे यासाठी आवाहन केले आहे.





Post a Comment

0 Comments