-->

Ads

ठाणे: घराचे छत कोसळले

या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.


ठाणे: वागळे इस्टेट येथील रामनगर भागात एकमजली छत कोसळल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. रामनगर येथील हनुमानमंदिराजवळ एक मजली घर आहे. या घरामध्ये चारजण वास्तव्यास होते.

गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घराचे छत कोसळले. रात्री घरात कोणीही नसल्याने दुर्घटना टळली. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर पथक घटनास्थळी दाखल झाले.

सुरक्षेच्या दृष्टिने घराभोवती धोकापट्टी बांधण्यात आली आहे. तर चारही जणांची वास्तव्याची व्यवस्था शेजाऱ्यांकडे करण्यात आली आहे.



Post a Comment

0 Comments