-->

Ads

श्री गणेश तरुण मंडळ (मानाचा पाचवा गणपती )गणपती चौक तळेगाव दाभाडे आयोजित व स्वर्गीय गणपतरावं पंढरीनाथ शिंदे स्मृती देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेत आदर्श विद्यामंदिर प्रथम.

रेखा भेगडे:तळेगाव दाभाडे : तळेगाव नगरीतील मानाचा पाचवा गणपती असलेल्या श्री. गणेश तरुण मंडळ आयोजित स्व. गणपतरावं पंढरीनाथ शिंदे स्मृती देशभक्तीपर गीतांवर समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी पंचक्रोशीतील शाळांनी या उपक्रमास उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. स्पर्धेचे उदघाटन श्री राजू शंकरराव शिंदे यांनी केले. या वर्षी वीस शाळांनी सहभाग घेतला असून पाचशे विध्यार्थी सहभागी झाले होते. श्री. राजू शंकर शिंदे यांनी सर्व स्पर्धेकांना शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. मंडळाचे अध्यक्ष अनिल फाकटकर आणि उत्सव प्रमुख स्वप्नील गुप्ते यांच्याबरोबर सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्पर्धेचे नेटके आयोजन केले. परीक्षण म्हणून सौ. मेधा रानडे व डॉक्टर सिद्धी शहा यांनी काम पाहिले.

सर्व स्पर्धेकांनी अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये आपले स्पर्धेचे सादरीकरण केले.

यश झोडगे, साहिल गुप्ते, ओंकार मेढी,, वैष्णव आंबेकर, शुभम फाकटकर, अथर्व कुलकर्णी, प्रांजल पंचोली,सानिका टकले, आर्य मेढी, शिवानी कर्वे, प्रतीक मेहता, आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कष्ट घेतले.

निकाल पुढीलप्रमाणे :

*बालवाडी गट

प्रथम क्रमांक -पैशाफंड प्राथमिक शाळा

द्वितीय क्रमांक -जैन इंग्लिश स्कूल

उत्तेजनार्थ आदर्श विद्या मंदिर

*पहिली ते चौथी गट

प्रथम -क्रमांक सरस्वती विद्या मंदिर

द्वितीय -क्रमांक पैशाफंड प्राथमिक शाळा

उत्तेजनार्थ -आदर्श विद्यामंदिर

*पाचवी ते सातवी गट

प्रथम क्रमांक -आदर्श विद्यामंदिर

द्वितीय क्रमांक -सरस्वती विद्यामंदिर

उत्तेजनार्थ -सिद्धांत स्कूल

मा. राज्यमंत्री श्री. बाळा भेगडे यांच्या वतीने विशेष पारितोषिक जैन इंग्लिश स्कूल तळेगाव दाभाडे. स्पर्धेमध्ये श्री सिद्ध गणेश मानचिन्हाबरोबर स्व. बबनराव धर्माजी गरुड यांच्या स्मृतीनिमित्त चषक दिले जातात.

*वैयक्तिक पारितोषिक

सान्वी सांडभोर -पैशाफंड प्राथमिक शाळा बालवाडी

नम्रता मोकाशी -आदर्श विद्यामंदिर

तानिया कुमारी -सिद्धांत स्कूल सुदुंबरे.

मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते श्री. दत्तात्रय बळवंत मेढी आणि श्री. सतीश महादेव संभूस उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments