पावसाच्या हजेरीमुळे शनिवार आणि रविवार या दिवशी लोणावळ्यात पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता
लोणावळ्यात तीन आठवड्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. गेल्या २४ तासात १०० मिलिमीटर इतका पाऊस कोसळला आहे. यामुळे लोणावळ्यातील व्यावसायिक आनंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यानंतर लोणावळ्यात देखील पर्यटकांची गर्दी ओसरली होती. पुन्हा एकदा आता लोणावळ्यामध्ये पर्यटकांची गर्दी होईल अशी आशा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
पुणे जिल्ह्यात लोणावळा ही पर्यटन नगरी म्हणून ओळखला जातो. पावसाने दडी मारल्याने पर्यटन नगरीकडे गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांनी देखील पाठ फिरवली होती. पण शुक्रवार रात्रीपासून पावसाने तुफान बॅटिंग करत लोणावळाकरांना झोडपून काढलं आहे.
गेल्या २४ तासात लोणावळ्यामध्ये १०० मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या वर्षी याच काळात ४५८३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी आत्तापर्यंत ३८०६ मीटर पावसाची नोंद झालेली आहे. पावसाच्या हजेरीमुळे शनिवार आणि रविवार या दिवशी लोणावळ्यात पुन्हा एकदा गर्दी होण्याची शक्यता आहे.
0 Comments