रेखा भेगडे : पिंपरी चिंचवड : रोटरी क्लब वाल्हेकरवाडी यांच्या वतीने चिंचवड विभागातील ट्रॅफिक पोलीस आणि त्यांचे सहकारी यांच्या सोबत रक्षाबंधन हा भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सन खूप आनंदात साजरा करण्यात आला.
वाल्हेकर वाडी रोटरी क्लब चे अध्यक्ष सुधीर मरळ यांची ही अनोखी अशी कल्पना होती. कार्यक्रमाच्या वेळेस सुधीर म्हारळ सर मनाले कि, राखी हे एक विश्वसाचे प्रतीक आहे आणि आणि पोलीस हे आपले काम चोवीस तास कुठलीही सुट्टी न घेता बजावत असतात. कोणताही सन असेल तरी पोलिस हे आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यामुळे वाल्हेकरवाडी रोटरी क्लब यांच्या वतीने या सर्व ट्रॅफिक पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी यांना राख्या बांधून रक्षाबंधन सन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी ज्योतीताई संदीप भालके, रेश्मा बोरा, अनुजा म्हारळ, स्वाती सुनील वाल्हेकर,सरिता पवार, प्रीती मुनोत, तसेच पोलीस अधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी, स्वयता महिला प्रतिष्ठान अध्यक्षा निर्मला जगताप, शशिकला निकम, नीरजा देशपांडे, उर्मिला चावरे, जयश्री वीरकर, कांचन राजकर, वनिता गोसावी तसेच रोटरी क्लब च्या इतर महिला या ठिकाणी उपस्थित होत्या.
तसेच ट्रॅफिक पोलीस सिनियर इन्स्पेक्टर अजय जोगदंड साहेब, ASI मोरे साहेब, ASI मालवडकर साहेब, ASI रत्नपारखी साहेब, HC कुलकर्णी साहेब, HC सरोदे साहेब, LPN बरवाडे साहेब, PC उबाळे साहेब तसेच कार्यरत इतर स्टाफ उपस्थित होता.वाल्हेकरवाडी रोटरी क्लब चे अध्यक्ष सुधीर मरळ सर तसेच सेक्रेटरी रामेश्वर पवार, वसंत ढवळे, संदीप भालके, रुपेश मुनोत, गणेश बोरा, सुभाष वाल्हेकर इत्यादी रोटरी क्लब चे सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते.
0 Comments