-->

Ads

Air Hostess Death Case: एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या; लॉकअपमध्ये पँटने घेतला गळफास

 Rupal Ogare Death Case Mumbai: रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसची हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल याने आत्महत्या केली आहे.


Rupal Ogare Death Case:
 मुंबईजवळील पवई इथं एका विमान कंपनीत एअर होस्टेस अर्थात हवाई सुंदरी म्हणून काम करणाऱ्या एका तरुणीची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आता एक सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. रुपल आग्रे नावाच्या एअर होस्टेसची हत्या करणारा आरोपी विक्रम अटवाल याने आत्महत्या केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पवई इथे राहणाऱ्या रुपल आग्रे या एअर होस्टेसची दोन दिवसांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रम अटवालला अटक करण्यात आली होती. या आरोपीने मुंबईतील अंधेरी परिसरात असलेल्या लॉकरमध्ये (कारागृह) आत्महत्या केली.

शुक्रवार( ८, सप्टेंबर) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी विक्रम अटवाल याने पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीचा मृतदेह जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात येईल, तिथे त्याचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

मरोळ मारहाव रोडवर असलेल्या एन जी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये रुपल आग्रे ही एअर होस्टेस राहत होती. याच बिल्डिंगमध्ये साफसफाईचं काम करणाऱ्या विक्रम अटवाल याने तिची निर्घृण हत्या केली. या भयंकर घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती.



Post a Comment

0 Comments