-->

Ads

कुर्ल्यामध्ये इमारतीला भीषण आग; 39 जण रुग्णालयात दाखल; 60 जणांची सुखरूप सुटका

 

मुंबईमध्ये मोठी दुर्घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीमध्ये 39 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीच्या वेगवेगळ्या मजल्यावरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे.

जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. मात्र, ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

कुर्ला पश्चिमेकडील कोहिनूर हॉस्पिटलसमोर असणाऱ्या १२ मजली इमारतीमध्ये काल (शुक्रवारी) मध्यरात्री आग लागली होती. आगीमुळे इमारतीत जवळपास 50 ते 60 जण अडकले होते. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments