-->

Ads

Wanindu Hasaranga: बहिणीच्या लग्नात स्टार क्रिकेटपटू ढसाढसा रडला; पाहा भावूक करणारा VIDEO

Wanindu Hasaranga: बहिणीच्या लग्नात स्टार क्रिकेटपटू ढसाढसा रडला; पाहा भावूक करणारा VIDEO


Wanindu Hasaranga Cyring In Sisters Wedding:

आशिया चषक स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत.या स्पर्धेत श्रीलंकेचा संघ देखील दोन हात करताना दिसून येणार आहे. या स्पर्धेपूर्वी श्रीलंका संघातील अष्टपैलू खेळाडूचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर होऊ लागला आहे, ज्यात तो ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

नुकताच वानिंदू हसरंगाच्या धाकट्या बहिणीचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला वानिंदू हसरंगाने देखील हजेरी लावली होती. जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली त्यावेळी तो भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. बहिणीला मिठी मारताच त्याला अश्रु अनावर झाले. त्याला रडताना पाहून धाकट्या बहिणीला देखील अश्रु आवरले नाही. हा १ मिनीट २१ सेंकदांचा भावूक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. 

निवृत्तीची केली घोषणा...

काही दिवसांपूर्वीच त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने श्रीलंका क्रिकेट बोर्डाला पत्र लिहून निवृत्त होणार असल्याची माहिती दिली होती. कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीदेखील तो मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये आणि लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येणार आहे.

दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेला मुकणार...

आशिया चषक स्पर्धेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू वानिंदू हसरंगा आणि दुष्मंता चमिरा हे दोघेही दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाले आहेत. इतकेच नव्हे तर स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच संघातील २ खेळाडूंना कोविडची लागण झाली आहे.


Post a Comment

0 Comments