-->

Ads

Raj Thackeray : पुणे शहरातील वाहतूक कोंडीवर राज ठाकरे यांचे मार्मिक शब्दांत विश्लेषण

Raj Thackeray in Pune : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे शहरातील खड्ड्यांना कोण जबाबदार आहे? याचे उत्तर राज ठाकरे यांनी दिले.


पुणे | 18 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी रस्त्यासंदर्भात माध्यमांशी बोलताना परखड मत मांडले. यापूर्वी राज ठाकरे यांनी शहरातील खड्ड्यांवरून आंदोलन करण्याचा आदेश मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. त्यानंतर पुणे शहरात १६ ठिकाणी आंदोलन करण्यात आली. मनसेकडून विविध रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण केले गेले आणि रांगोळी काढली गेली. आता शुक्रवारी या खड्ड्यांना मतदारच कसे जबाबदार आहे? हे सांगितले.

काय म्हणाले राज ठाकरे

पुणे शहर वाढले आहे. परंतु शहराचे टाऊन प्लॅनिंगच झालेले नाही. यामुळे पुणे शहरात १५ ते २० मिनिटांचा प्रवासासाठी तासभर लागतो. टाऊन प्लॅनिंग मुंबईत इंग्रजांनी केलेले आहे. त्यानंतर आपल्या राज्यकर्त्यांनी शहरांचा आराखडाच केला नाही. यामुळे हे प्रश्न निर्माण झाले आहेस असे राज ठाकरे यांनी सांगितले.

मुंबई पुणे महामार्गावर खड्ड्यांमुळे मनसेकडून टोल नाकाही फोडण्यात आला. त्यानंतर टोल नाक्यावर बंदोबस्त वाढवण्यात आला.

खड्ड्यांना कोण जबाबदार

पुणे शहरातील खड्डयासंदर्भात मनसेने आंदोलन सुरु केले आहे. कोथरूड, सेनापती बापट रस्ता, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्ता, मॅाडेल कॉलनी, लाहोटी हॉस्टेल, कोंढवासह आदी १६ ठिकाणी हे आंदोलन सुरु आहे. परंतु रस्त्यावरील खड्यांना मतदारच जबाबदार आहे. कारण हे खड्डे काम पहिल्यांदाच पडले नाहीत. रस्त्यावर खड्डे असताना मतदार पुन्हा त्याच लोकांना निवडून देतात. मतपेटीतून राग व्यक्त केल्याशिवाय रस्त्यावरील खड्डे बुजणार नाही. जे महाराष्ट्राचे नुकसान करतात त्यांना तुम्ही निवडून देतात, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

उच्च न्यायालायने फटकारले होते

पुणे आणि मुंबईमधील खड्ड्यांसदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही महानगरपालिकांना फटकारले होते. तुमची कामे आम्हाला करायला लावू नका, अशा शब्दांत न्यायालयाने नुकतेच फटकारले होते. त्यानंतर पुणे मनपाने केवळ चार कनिष्ठ अभियंत्यांना रस्त्यावरील खड्ड्यांसंदर्भात ’कारणे दाखवा नोटीस’ दिली होती. जुलै महिन्यात मनपाने पावसामुळे खड्डे बुजवण्यास अडथळे येत असल्याचे म्हटले होते.

Post a Comment

0 Comments