हल्ला कुणाला कोणत्या कारणातून राग येईल आणि समोरचा काय करेल याचा नेम नाही. नांदेडमध्ये घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वच हादरले आहेत.
नांदेड / 18 ऑगस्ट 2023 : नांदेडमध्ये क्षुल्लक कारणातून हाणामारी, हल्ले अशा अनेक घटना उघडकीस येत आहेत. अशा घटनांमध्ये काही दिवसात वाढ झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केवळ हसल्याच्या कारणावरून एका फळ विक्रेत्याने भाजीपाला विक्री करणाऱ्या तरुणांचे दोन्ही हात छाटले आहेत. आरोपीने मनगटापासून दोन्ही हात छाटले. अझहर मोहम्मद असे पीडित तरुणाचे नाव आहे. तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठवडी बाजारात भर दुपारी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. मोहम्मद तोहीद असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.
डी-मार्ट परिसरातील आठवडी बाजारात आरोपी मोहम्मद अजीज याचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. तर पीडित अझहर मोहम्मद याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. बुधवारी दुपारी दोघांमध्ये हसण्यावरुन वाद झाला. हा वाद विकोपाला गेला. त्यानंतर आरोपीने कोयता विकत आणला आणि पीडित अझहरचे हात तोडले. तसेच पाठीवर आणि पायावरही वार केले. या घटनेमुळे बाजारात एकच खळबळ उडाली.
जखमी अवस्थेत अझहरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच भाग्यनगर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला आहे. विशेष म्हणजे महिन्या भरापूर्वी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारची हात छाटल्याची घटना घडली होती. आता पुन्हा अशा प्रकारे घटना घडल्याने कोयत्याने हात छाटणारी गँगच सक्रिय झाल्याच दिसून येतं आहे.
0 Comments