-->

Ads

Jalna Crime News: जालन्यात तरुणाची हत्या; मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मागत होता मदत

 Jalna News : जालन्यात तरुणाची हत्या; मारहाण होत असताना नातेवाईकाला फोनवरून मागत होता मदत


जालना : जालन्यातील भिलपुरी येथे अज्ञात कारणावरून तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हि धक्कादायक घटना  जालना शहरातील भिलपुरी परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसातगुन्हा दाखल करण्यात येत आहे.

सिध्दार्थ मांदळे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. सिद्धार्थ यास काहीजण कारण नसतांना मारहाण करत होते.  मारहाणीनंतर तरुणाला जालना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण त्याआधीच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मारहाण होत असताना सिद्धार्थ मांदळे याने नातेवाईकाला फोन लावला. मारहाणीदरम्यान तो फोनवरून मदत मागत होता. मदत मागतानाचा त्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे.

Post a Comment

0 Comments