-->

Ads

Dharashiv News: विकृतीचा कळस! ६८ वर्षीय नराधमाचे ४ वर्षीय चिमुकलीसोबत संतापजनक कृत्य; अत्याचाराच्या २ घटनांनी जिल्ह्यात खळबळ

 Dharashiv Latest News: अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या दोन धक्कादायक घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.


Dharashiv Crime News: दोन अल्पवयीन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी धाराशिव जिल्हा हादरून गेला आहे. धाराशिवच्या इंदापूर आणि कळंब शहरातून या घटना समोर घडल्या असून पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, ४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर ६८ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. वाशी तालुक्यातील इंदापूरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. अल्पवयीन मुलगी शेजारी नातेवाईकांकडे खेळायला आली असताना त्याने घरात नेवून मुलीवर अत्याचार केले.

मुलीच्या आईने मुलगी रडत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणात आरोपीला अटक केली असून न्यायालयाने ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

तर दुसरी घटना धाराशिवच्या कळंब शहरात घडली. या घटनेत 4 वर्षाच्या मुलीवर 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने घरात आलेल्या शेजारच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या दोन धक्कादायक घटनांनी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. 

Post a Comment

0 Comments