कर्नाटकच्या बागलकोट चौकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थानिक प्रशासनाने हटवला आहे. यामुळे शिवप्रेमींमध्ये संताप निर्माण झाला आहे. गुरूवारी रात्री जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला आहे. हा पुतळा परवानगीशिवाय स्थापन केल्याचा आरेप स्थानिक प्रशासनाने केला आहे. कर्नाटक सरकारने पुतळा हटवल्याने स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यास सुरूवात झाली आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे यांची प्रतिक्रिया
तर याच प्रकरणावर भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी कर्नाटकातील काँग्रेस सरकारला इशारा दिला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा तातडीने बसवा अन्यथा काँग्रेस नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी काँग्रेस सरकारला दिला आहे.
शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
दरम्यान या संदर्भात बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, जर सरकारने तो पुतळा हटवला असेल तर ती दुर्दैवी बाब आहे. त्याचे प्रायश्तित त्या सरकारला भोगावे लागेल, असे भरत गोगावले यांनी म्हटलं आहे.
0 Comments