-->

Ads

"गोमय बीज राखी महाराष्ट्र भर " महा एनजीओ फेडरेशनचा अभिनव उपक्रम

प्रतिनिधी: राजकुमार भगत :बेलोरा, पुसद आयोजक संस्था स्व. मधुकरराव भगत शहरी व ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, बेलोरा ता.पुसद जि.यवतमाळ 


तसेच महा एन.जी.ओ फेडरेशन द्वारा महाराष्ट्रातील १०० ठिकाणी १०० सामाजिक स्वयंसेवी संस्थाच्या माध्यमातून गोमय बीज राखी महाराष्ट्रभर पोहचविण्याचा संकल्प श्रीशेखर मुंदडा  संस्थापक  : महा एनजीओ फेडरेशन व नवनिर्वाचित महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष यांनी केला होता. जवळपास महाराष्ट्र भर २५०० पेक्षा अधिक सामाजिक स्वयंसेवी संस्था फेडरेशनसोबत महाराष्ट्रभर जोडल्या गेल्या आहेत. प्रत्येक महिन्यात असे समाजोपयोगी व नानाविध आदर्श समजा पुढे मांडणारे अभिनव उपक्रम करणारी शिखर संस्था महा एन.जी.ओ फेडरेशन परिचित आहे.

महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे यांनी यासाठी विशेष समन्वय साधला. प्रत्येकाच्या घरात एक देशी गोमाता अपेक्षित आहे की ज्याने अध्यात्मिक व आरोग्याच्या बाबतीत महत्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते. गाईचे दुधाशिवाय देखील अन्य गोष्टीमधून आपण आर्थिक साक्षर होऊ शकतो. याचेच उदाहरण म्हणून राखीची निर्मिती आहे. गो आधारित अर्थ व्यवस्था, देशी गाईंचे संगोपन, संवर्धन व संरक्षण व अर्थव्यवस्था या रचनेवर यंदाची मांडणी फेडरेशनने केली आहे.


ह्यावर्षी प्रथमच आम्ही गोमातेच्या पंचगव्यापासून रक्षासूत्र बनवण्याचे आदिवासी महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे कामही या माध्यमातून केले आहे.पर्यावरण पूरक रक्षा सूत्रामुळे प्रदूषण टाळण्या बरोबरच बहिण-भावाच्या हळुवार नात्याचा अंकुर आता प्रत्यक्ष गोमातेच्या आशीर्वादाने अंकुरणार आहे. तसेच उमेद च्या महिला सौ.रमा कांबळे, शांता खंदारे, प्रीती आरगुलवार, ज्योती कांबळे, आणि संस्थेच्या सचिव मनीषा अमोल भगत उपस्थित होत्या.


Post a Comment

0 Comments