वाढदिवसानिमित्त, उपजिल्हा रुग्णालय येथे गरजू, व महिला तसेच रुग्ण नातेवाईक यांना अन्नदान वाटप
प्रतिनिधी ज्ञानेश्वर मेटकर: पुसद विधानसभेचे आमदार ऍडव्होकेट इंद्राणील नाईक यांच्या सुविद्य पत्नी, तथा सामाजिक कार्यकर्त्या मोहिनी इंद्रनील नाईक यांचा वाढदिवस, माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे, सर्व सामाजिक कार्यकर्तागणं आमदार इंद्राणील नाईक, यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला.
माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन, यांच्या वतीने दर दिवशी गरजू आबाल वृद्ध व उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णाचे नातेवाईक यांना दोन वेळेचे भोजनदान दिले जाते.
तसेच समाजातील विविध घटक, प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक कार्यकर्ता इत्यादी संघटनाचे पदाधिकारी इत्यादी कार्यकर्ता आपले वाढदिवस याच ठीकाणी येउन साजरा करतात,त्याच अनुषंगाने आज
दिनांक 27 ऑगस्ट 2023 रोजी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन येथे गरजू वअबालवृद्ध तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना भोजनदान देऊन वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मोहिनी ताई इंद्रनील नाईक आमदार महोदयाच्या पत्नी म्हणून परिचित तर आहेतच परंतु त्यांचे सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रमाच्या माध्यमातून केलेले काम तसेच महिला संघटनेचे विविध सामाजिक ग्रुप इत्यादीच्या माध्यमातून त्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून परिचित झालेल्या आहेत त्यांचा चाहता वर्ग सुद्धा दिवसें दिवस वाढत असून आज सकाळपासूनच विविध ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत "आपल्या जीवन संगिनी यांच्या साठी वेळात वेळ काढून विधानसभेचे आमदार इंद्रनील नाईक यांनी आपल्या पत्नीचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतर्गत मंचावर येऊन साजरा केला हे मात्र विशेष" यावेळी प्रामुख्याने उपस्थित,आमदार इंद्रनील नाईक, बाळासाहेब कामारकर, नरेंद्र पवार सर, माणुसकीची भिंत फाउंडेशन चे अध्यक्ष गजानन जाधव, ऋषिकेश पंडित कर विकास चव्हाण, निशांत राठोड, पंकज पाल महाराज, पंजाबराव ढेकळे, करण ढेकळे, कुमारी वैष्णव जाधव कुमारी गौरी जाधव कुमारी सिद्धी आगाम इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती.
0 Comments