-->

Ads

वाल्हेकर वाडी येथील मनपाच्या मुलांच्या शाळेमध्ये शिक्षकांची नेमणूक करण्याची शिवसेनेचीं मागणी.



पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )विभाग प्रमुख श्री. संदीप अंतू भालके यांनी दिनांक 2/8/23 रोजी मा. सहाय्यक आयुक्त थोरात साहेब पिंपरी चिंचवड मनपा यांना शिक्षकांची नेमणूक करण्याबाबत निवेदन देण्यात आले.यावेळेस सौ. अनिता तुतारे(शिवसेना पिंपरी चिंचवड शहर संघटिका ), सौ. रजनी रघुनाथ वाघ (उपशहर संघटिका शिवसेना ), सौ. ज्योती संदीप भालके (उपशहर समन्वयक शिवसेना ), सौ. वंदना खंडागळे (उपविभाग संघटिका )




वाल्हेकर वाडी चिंचवड मुले.18/1 शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वी चीं पटसंख्या 350 आहे तर इयत्ता 6 वी ते 7 वी चा पट 140 आहे. वरील पटनुसार आज रोजी शाळेमध्ये उपशिक्षक संख्या 9 आहे तरी पटसंख्येनुसार शाळेला एका उपशिक्षकाची आवश्यकता आहे.

6 वी ते 7वी च्या पटसंख्येनुसार आज शाळेमध्ये इकच पदवीधर शिक्षक असून अजून 3 उपशिक्षकांची (पदवीधर )आवश्यकता आहे.

शालेय व्यवस्थापन पाहण्याकरिता मुख्याध्यापका ची  आवश्यकता आहे. एकंदरीत शाळेचा पट पाहता शाळेसाठी 1मुख्याध्यापक,1उपशिक्षक,3पदवीधर शिक्षक या प्रमाणे शिक्षकांची आवश्यकता आहे.

वरील प्रमाणे शिक्षक मागणी करताना शाळेतील मुख्याध्यापक सौ. उज्वला ढमढेरे सेवा निवृत्त (मार्च महिन्यात )झाल्या आहे. तसेच सौ. प्रमिला होले व सौ. ज्योती तापकीर यांचीं पदोन्नती डिसेंबर 2022ला झाली आहे. तसेच दोन पदवीधर बदली होऊन गेले आहे व इकच शाळेत रुजू झाले आहेत.शाळा चालू होऊन तीन महिने झाले आहे शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलांचे नुकसान होत आहे.

त्यामुळे वाल्हेकर वाडी पिंपरी चिंचवड येथील मुलांच्या शाळेत मुलांची गैरसोय होत असल्यामुळे लवकरात लवकर शिक्षकांची रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे विभागप्रमुख संदीप भालके यांनी केली आहे.


आपला नम्र,

                श्री. संदीप अंतू भालके (पिंपरी चिंचवड शहर शिवसेना विभाग प्रमुख )

संपर्क क्रमांक :9921517236

Post a Comment

0 Comments