अकोल्याचे आयपीएस अधिकारी सुरज गुंजाळ यांना ड्राय डे दिवशी दारु विक्री करणाऱ्यांनी लपवलेली दारु खड्डे खोदून बाहेर काढली. सध्या या कारवाईचा व्हिडीओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अकोला : परिविक्षाधीन आयपीएस (IPS) अधिकारी सुरज गुंजाळ यांच्या एका कारवाईची सध्या चांगलीच चर्चा आहे. गुंजाळ यांनी अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड गावात दारूच्या अवैध विक्रीचा पर्दाफाश केलाय. यावेळी घराच्या स्वयंपाक घरात आणि अंगणात भुयार करून त्यात दारू लपविण्यात आली होती. गुंजाळ यांनी स्वत: हे दारूचे अड्डे उध्वस्त केले. या कारवाईत त्यांनी ३४ हजारांची अवैध दारू जप्त केली असून त्यांच्या कारवाईत दारु जप्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होतोय.
कोण कधी अन् कशी शक्कल लढवेल काही सांगता येत नाहीय. देशात १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. पण देशाचा स्वांतत्र्यदिन हा दिवस 'ड्राय-डे'असतो. या दिवशी दारू मिळत नसल्यानं अवैध दारू विक्रेते अगोदरच्या दिवशी अवैध दारु साठा जमा करून ठेवतात. असाच अवैधरित्या जमा करुन ठेवलेला दारु साठा अकोट ग्रामिण पोलिसांनी 'ड्राय-डे'च्या दिवशी जप्त केलाय. पोलिस स्टेशन हद्दीतील पोपटखेड गावातील दोन पठ्ठ्यांनी तर कमालच केली होती. त्यांनी दारूचा साठा चक्क घरातील किचन, बेडरूममध्ये खड्डा करून लपवून ठेवला होता. परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी (IPS) सुरज गुंजाळ व त्यांच्या पथकानं अक्षरश: फावड्यानं अन् कुदळनं घरातील खड्डे खोदून ३४ हजार रूपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा ताब्यात घेतला.
0 Comments