-->

Ads

‘जाळ्यात अडकणं वाईट नसतं’, मृत्यूच्या दाढेत एकटा चिमुकला जीव; खवळलेल्या समुद्रातील थरार पाहून व्हाल थक्क

कधीतरी एखादी अशी घटना डोळ्यासमोर येते की ज्याने अजूनही माणसात माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवता येतो.


Cats Video Viral On Instagram: सोशल मीडियावर भांडणाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. बातम्यांमध्ये सुद्धा खून, दरोडे, अत्याचार, बलात्कार या घटनांचं प्रमाण खूप असतं पण कधीतरी एखादी अशी घटना डोळ्यासमोर येते की ज्याने अजूनही माणसात माणुसकी जिवंत आहे यावर विश्वास ठेवता येतो. एका चिमुकल्या जीवाला वाचवण्यासाठी दोन खऱ्या आयुष्यातील शूरवीरांनी घेतलेली मेहनत सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. एरवी आपण जाळ्यात अडकणं हा शब्दप्रयोग ऐकला की काहीतरी चुकीचंच घडणार, कुठेतरी नुकसानच होणार असा विचार करू लागतो पण जाळ्यात अडकल्याने एखाद्याचा जीव वाचू शकतो हे तुम्ही आज पहिल्यांदाच पाहणार आहात.

@giedde या अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये समुद्राच्या किनाऱ्याला जोडून असणाऱ्या लहानश्या पुलावर एक मांजरीचं पिल्लू अडकल्याचे दिसत आहे. पावसामुळे खवळलेल्या समुद्राच्या लाटा या पुलाला येऊन आदळताना दिसत आहेत. अशात गांगरून गेलेलं मांजरीचं पिल्लू त्या पुलावर एकटंच अडकलं आहे. किनाऱ्याजवळ अनेकांची गर्दी त्याला बाहेर कसं पडता येईल यासाठी हातवारे करून समजवताना दिसतेय पण यातील दोन जण जीवाची बाजी लावून जाळं घेऊन तिथे पोहोचतात. सुरुवातीला मांजरीच्या पिल्लाला त्यांच्यावर विश्वास नसतो त्यामुळे ते पिल्लू सुद्धा उलट पळायला सुरुवात करतं. अखेरीस इकडे आड तिकडे विहीर अशी स्थिती असताना पिल्लू माणसांवर विश्वास ठेवतं, आणि ते दोघे सुद्धा त्याला जाळ्यातून अलगद उचलून बाहेर घेऊन येतात.


Post a Comment

0 Comments