-->

Ads

जिल्हा परिषद कन्या शाळा व मुलांची शाळा बेलोरा येथे रक्षाबंधन उत्सवात साजरा


 प्रतिनिधी: राजकुमार भगत : बेलोरा, पुसद; पुसद तालुक्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद शाळा मध्ये दिनांक 28 ऑगस्ट व 29 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद कन्या शाळा  व मुलांची शाळा बेलोरा बु या ठिकाणी उत्सव रक्षाबंधनाचा हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा  करण्यात आला. याप्रसंगी दिनांक 28 ऑगस्ट 2023 रोजी सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा बेलोरा या ठिकाणी विद्यार्थ्यांचे दहा गट तयार करून विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित केली.


एकूण दहा गटातील विद्यार्थ्यांनी एकूण 30 राख्या बनवल्या व नंतर विद्यार्थ्यांनी वैयक्तिक राख्या बनवून आणल्या यानंतर ह्या राख्यांची प्रदर्शनी भरवण्यात आली आणि या प्रदर्शनीचे निरीक्षण करण्यासाठी परीक्षक म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री पांडुरंग मार्कड, श्री महेश मस्के,  श्री अनिल कांबळे, श्री बालाप्रसाद मार्कड यांना आमंत्रित करण्यात आले त्यांनी राख्यांच्या प्रदर्शनीमध्ये परीक्षण करून दहा गटातून तीन क्रमांक काढण्यात आले व वैयक्तिक मधून तीन क्रमांक देण्यात आले .


यामध्ये गटातून पहिला क्रमांक कु राधिका झुंजारे गट ,दुसरा क्रमांक उमा मस्के गट, तिसरा क्रमांक आदिती मस्के गट, वैयक्तिक मध्ये पहिला क्रमांक अक्षरा झुंजारे दुसरा क्रमांक माई खंदारे तिसरा क्रमांक जैनब उस्मान शेख यांनी मिळविला यानंतर लगेचच परीक्षकाचे आभार मानण्यात आले. परीक्षकापैकी श्री महेश मस्के यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शाळेमध्ये रक्षाबंधनाचा उत्सव प्रत्यक्षरीत्या राबविण्यात आला 

त्यामध्ये विद्यार्थिनींनी सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या तसेच   याप्रसंगी विद्यार्थिनींनी शिक्षक बांधवांना सुद्धा राख्या बांधल्या  आणि उत्सव साजरा केला.  ह्यानंतर येणाऱ्या सप्टेंबरमधील उपक्रमाची माहिती देऊन रक्षाबंधनाचा उत्सव समारोप करण्यात आला .याप्रसंगी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद  ह्यांचे सहकार्य लाभले. गावकऱ्यांनी विध्यार्थी यांचे कौतुक केले...


Post a Comment

0 Comments