वडगाव मावळ : पवनानगर परिसरातील कोथुरणे (ता. मावळ )या गावातून एका 7 वर्षीय चिमुकलीचे 2 ऑगस्ट 2022 रोजी अपहरण झाले होते. ही माहिती बघता बघता वाऱ्यासारखी पसरली होती सर्व ठिकाणी स्वराचा शोध घेऊन देखील ती सापडली नाही. तिच्या वडिलांनी मुलगी हरवली असल्याची तक्रार कमशेत पोलीस स्टेशन ला केली. गावातील मंदिरासमोर खेळत असलेली मुलगी 2ऑगस्ट 2022 रोजी अचानक बेपत्ता झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. व स्वराच्या आई वडिलांसह नातेवाईक तसेच गावातील सर्वच लोक तिचा शोध घेत होते.दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या अथक प्रयत्नाने केलेल्या तपासात तिच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागील बाजूस तिचा खून झालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर स्वरावर लैंगिक अत्याचार करून खून केल्याचे लक्षात आले. या घृणास्पद प्रकारमुळे मावळ तालुक्यासह पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र च हदरून गेला होता.
या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण मावळ तालुका एकवटला होता. स्वराला न्याय देण्यासाठी वेगवेगळ्या संघटनानी निषेध मोर्चे काढले. कॅण्डल मार्च काढले.
तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपधीक्षक मितेश घट्टे व पुणे ग्रामीण पोलिसांनी या निर्दयी घटनेची तात्काळ दाखल घेत आरोपीचा मागमूस काढण्यात सुरुवात केली. अखेर दुर्गा स्वान पथकच्या साहाय्याने आरोपीची ओळख पाठवण्यात पोलिसांना यश आले. तेजस महीपती दळवी (वय -25) कोथुरणे ता. मावळ जिल्हा पुणे असे आरोपीची ओळख आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या.त्यानंतर आरोपीने त्याचे आरोप कबूल केले चोकोलेट चे अमिश दाखून त्याने स्वरावर अत्याचार केला वा तीचा खून केला होता. आरोपी हा पूर्वीपासून च खराब वृतीचा होता. आरोपीला ला फासीची शिक्षा व्हावी यासाठी सर्व मावळ एकवटला होता. त्यावेळी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांनी पडितेच्या कुटुंबियांना वेगवेगळी आस्वासाने दिली होती पण प्रत्यक्षात स्वराच्या कुटुंबियांना नाही न्याय मिळाला. नाही काही मदत मिळाली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी त्यांची एकच इ छया आहे जेणेकरून अजून दुसरी स्वराच्या आत्म्याला शांती मिळेल आणि गुन्हेगार गुन्हा करताना दहा वेळा विचार करेल.
0 Comments