वडगाव मावळ :भाजपा मावळ तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी मावळ तालुका तहसीलदार यांना याबाबत एक पत्र लिहिले आहे. ज्यात त्यांनी, शासनाने स्थगिती दिलेला पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करणेबाबत लिहिले आहे. मावळ तालुक्यातील शेतकरी व जनतेच्या वतीने आपल्या निदर्शनास आणू इच्छितो कि. पवना धरण ते निगडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प पास सुरुवातीपासून च तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध होता, आहे व कायम राहील असे स्पष्ट मत रवींद्र भेगडे यांनी लिहिले आहेत
सेच 'पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा यासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांसह भारतीय जनता पार्टी व भारतीय किसान संघाच्या वतीने तत्कालीन सरकारच्या विरोधात दिनांक 9 ऑगस्ट 2011 रोजी मुंबई पुणे दृतगती महामार्गांवर बौर फाटा येथे तीव्र आंदोलन केले होते. या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी
गोळीबार केला होता. त्यामध्ये तीन शेतकरी बांधव शाहिद झाले. तर काही शेतकरी जखमी झाले होते. ही बाब शासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या प्रकल्पास स्थगिती देण्याचे आदेश दिलेले आहेत ते आजतगायत कायम आहे. तरी या प्रकल्पास तालुक्यातील शेतकरी बांधवांचा विरोध लक्षात घेता हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल याची आपण नोंद घ्यावी. असे पत्र रवींद्र भेगडे यांनी तहसीलदार मावळ विक्रम देशमुख यांना लिहिले आहे.
0 Comments