विवाहबाह्य संबंधांमुळे एक हसतं-खेळतं घर क्षणात उध्वस्त झालं. पती-पत्नी दरम्यान झालेला वाद तिच्या जीवावरच बेतला.
Crime News : पती-पत्नीमध्ये वाद नेहमी होतच असतात, पण ते क्षणिक असतात. सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देणाऱ्या नवार-बायकोदरम्यान होणारे वाद काही काळाने मिटूनही जातात. पण झारखंडच्या गुमला येथे मात्र एका दांपत्यामध्ये झालेल्या वादाचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद (crime) होता. तेथे एका पतीने त्याच्याच पत्नीचे (husband killed wife) आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
झारखंडच्या गुमला जवळील एका गावात ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका इसमाचे विवाहबाह्य संबंध होते. मात्र त्याच्या पत्नीला ते बिलकूल पसंत नव्हतं. तिने त्याला अनेकवेळा विरोध केला. या मुद्यावरून त्यांच्यामध्ये कित्येक वेळा भांडणेही व्हायची. या घटनेच्या दिवशी देखील 42 वर्षीय मृत महिला आणि 45 वर्षीय आरोपी यांच्यात वाद झाला. मात्र त्यानंतर आरोपी एवढा संतापला की त्याने त्याच्या पत्नीच्या डोक्यात रॉड घालून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेची सूचना मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
पति-पत्नी मध्ये नेहमी व्हायचे वाद
आरोपी भोलो याचे एका महिलेश अवैध संबंध होते. हे त्याची पत्नी सुंगति देवी हिला समजल्यावर तिने त्याला बराच विरोध केला. यावरून त्यांच्यात बऱ्याच वेळेस वादही व्हायचा. त्यामध्य भोलो हा त्याच्या पत्नीला अनेकदा बेदम मारहाणही करायचा. पतीच्या या कृतीमुळे घाबरलेली महिला गेल्या महिनाभरापासून घरात राहत नव्हती. शेजारच्ंच्याया घरात वेळ घालवत होतो.
घटनेच्या दिवशी आरोपी भोलो हा मद्यधुंद अवस्थेत तेथे पोहोचला आणि तिच्याशी भांडू लागला. रागाच्या भरात त्याने सुंगती हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. या गुन्ह्याचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आरोपी पतीला अटक करून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
0 Comments