-->

Ads

श्री .दिनेश मलपे यांच्या शुभ हस्ते नाम फालकाचे अनावरण करण्यात आले.

 

कामगारांच्या न्याय हक्कासाठी दिनांक 31/7/2023 रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेना अध्यक्ष(महाराष्ट्र राज्य )मा.श्री .दिनेश मलपे यांच्या शुभ हस्ते नाम फालकाचे अनावरण करण्यात आले. तसेच मा. श्री. अरविंद अण्णा गायकवाड यांची महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेना मावळ तालुका सचिव पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम आणि जनरल कामगार सेनेचे पुणे जिल्हा सचिव मा. श्री. विनोद कांबळे, मावळ तालुका सचिव अरविंद गायकवाड,कामगार नेते विशाल खाडे, यांसह सागर मोहिते, नरेश कांबळे, निलेश जाचक, प्रशांत गरुड, नितीन फाकटकर  या मान्यवरांसाह कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.कामगारांच्या न्याय हक्कासाठी सर्वोतोपरी सहाय्य करण्याचे आश्वासन  देण्यात आले.



Post a Comment

0 Comments