-->

Ads

नागपूर: महामार्गालगतच्या वस्त्यांना अपघाताचा धोका, गतीरोधकही नाही

ही जागा अपघात प्रवणस्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहे.


नागपूर: वर्धा मार्गावरील चिंचभुवन हे अपघात प्रवणस्थळ (ब्लॅकस्पॉट) घोषित करण्यात आले आहे. मात्र त्या ठिकाणी गतीरोधकही न लावल्याने वाहने सुसाट धावतात, परिणामी अपघाताचा धोका वाढला आहे.

चिंचभुवन चौरस्त्यावर एकाच वेळी चारही बाजूंनी वाहने येतात. तेथे अपघात होतात. ही जागा अपघात प्रवणस्थळ म्हणून घोषित करण्यात आली आहे. तेथे पूर्वी चारही दिशांनी गतिरोधक लावण्यात आले होते. पण काही महिन्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या मार्गावरून जाणार असल्याने गतीरोधक काढून टाकण्यात आले. त्यानंतर पुन्हा ते लावण्यातच आले नाही. त्यामुळे आता नागपूरहून वर्धेकडे जाणारी वाहने सुसाट वेगाने धावतात, त्याचप्रमाणे विरुद्ध दिशेने येणारी वाहनेही वेगात येतात.

चिंचभुवन गावातून येणाऱ्या वाहनांना रस्ता ओलांडताना अडचणी येतात. याच मार्गावर शाळा असल्याने त्यांच्या बसेसही एकाच वेळी येत असल्याने प्रचंड वाहनकोडी होते. मात्र सरकारचे याकडे काहीही लक्ष नाही. ॲप्रोच रस्त्यावर अतिक्रमण वाढले आहे. यात सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. गावात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महापालिकेने बांधलेल्या योगा शेडकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. आजूबाजूला गवत वाढले आहे. यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून डेंग्यूचा आजार वाढण्याची शक्यता आहे.




Post a Comment

0 Comments