पिंपरी चिंचवड:
पिंपरी चिंचवड शहर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )विभाग प्रमुख श्री. संदीप अंतू भालके यांनी शुक्रवार दिनांक : 18/8/2023 रोजी मा. सहाय्यक आयुक्त श्री. प्रदीप जांभळे पिंपरी चिंचवड मनपा यांना प्रत्यक्षात भेटून वाल्हेकर वाडी मुलांच्या 18/1 या शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहेत. म्हणून मुलांची होणारी अडचण आणि गैरसोय लक्षात घेता शाळेत त्वरित शिक्षक उपलब्ध करून द्यावे ही मागणी निवेदन साहेबांना देण्यात आले.
यावेळी श्री. संदीप भालके विभाग प्रमुख, सौ. ज्योतीताई भालके उपशहर समन्वयक शिवसेना, सौ. वंदना वाल्हेकर विभाग संघटिका, मुख्याध्यापिका भारती विभाडीक, नंदिनी खाडे शिक्षिका इत्यादी जण त्याठिकाणी उपस्थित होते.
0 Comments