आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके व मा. तहसीलदार साहेब वडगाव मावळ तालुका यांना मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणे बाबत निवेदन देण्यात आले.
प्रतिनिधी रेखा भेगडे:दि.३१/०७/२०२३ रोजी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी मावळ तालुका यांच्या वतीने मावळ चे लोकप्रिय आमदार श्री. सुनिल आण्णा शेळके व मा. तहसीलदार साहेब वडगाव मावळ तालुका यांना मावळ तालुक्यातील स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणे बाबत निवेदन देण्यात आले.
मावळ तालुक्याचे राज्य आणि देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. पिण्याचे पाणी आणि विजनिर्मिती साठी स्वातंत्र्य पूर्व काळात मावळ तालुक्यातधरणे झाली आहे स्वतंत्र्यानंतर औद्योगीकरण, शेती,पिंपरी -चिंचवड शहर आणि तीर्थस्थळाच्या पिण्याच्या पाण्यासाठी अनेक धरणे बांधली आहेत रेल्वे मार्ग,महामार्ग,दुर्गती मार्ग स्थानिकांनी आपल्या जमीन कवडीमोल भावाने दिले आहेत. संरक्षण खाते सीआरपीएफ औद्योगिक वसाहत अनेक सामाजिक संस्था शैक्षणिक हक्क उत्पादनासाठी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दिले आहे.मावळ तालुका औद्योगीकरणाने जगाच्या नकाशावर पोहचला आहे. लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल व्यवसायाला सुगीचे दिवस आहे मावळ तालुक्यात रोजगाराच्या अनेक संधी आणि सुविधा उपलब्ध असताना स्थानिकांना जाणीवपूर्वक डावळले जात असल्याचे आमचे निरीक्षण आहे. तळेगाव दाभाडे,टाकवे बुद्रुक,उर्से,लोणावळ्यातील औद्योगीकरणात स्थानिकांना रोजगारात ५० टक्के संधी मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. तसेच लोणावळा खंडाळ्यातील हॉटेल्स व्यवसाय तालुक्यातील फार्म हाऊस येथेही स्थानिकांना आपल्या कुवतीनुसार काम मिळावे आंदर मावळातील वाहनगाव येथे सुमारे ५०० कोटीचे गुंतवणूक असलेल्या महर्षी वैद्यकीय प्रायव्हेट लिमिटेडच्या आयुर्वेदिकशी संबंधित असलेल्या प्रकल्पासह तालुक्यात अनेक ठिकाणी यासारखे अनेक लहान मोठे प्रकल्प आहे. गहुंजे येथील स्टेडियम, पुणे मुंबई दृतगती महामार्गावर असलेल्या सेवा अशा कामातही स्थानिकांना प्राधान्य द्यावे. अशी विनंती निवेदनाद्वारे तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल आण्णा शेळके व तहसीलदार साहेबाना केली.
यावेळी उपस्थित किशोर सातकर,आशिष ढोरे सचिन मुऱ्हे सोमनाथ वाघोले अतुल मराठे आशिष बंसल संदीप खिरेड भारत अहिवळे जितेंद्र पानसरे चेतन थोरवे स्वप्निल मोडवे गजानन खरमारे सुजित सातकर केदार भवरे अरविंद पाटील सुमित गायकवाड जाफर शेख भानुदास जांभुळकर सागर बोडके स्वामी आदेश वंजारी रवींद्र चव्हाण प्रतीक काकरे
0 Comments