-->

Ads

Badalapur News: लसीकरणानंतर इंजेक्शनची सुई राहिली चिमुकलीच्या मांडीत, ५ महिन्यांनंतर जे घडलं ते जाणून उडेल थरकाप

 या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.


Badlapur News: लसीकरण (Vaccination) केल्यानंतर इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच राहिल्याचा धक्कादायक प्रकार बदलापूरमध्ये उघडकीस आलाय. नवव्या महिन्यात लसीकरण केल्यानंतर तब्बल पाच महिने इंजेक्शनची सुई चिमुकलीच्या मांडीतच अडकून होती. या प्रकरणी इंजेक्शन देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी चिमुकलीच्या आई-वडिलांनी केली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये राहणारे विशाल बनसोडे यांनी मुलगी अद्विकाचं नवव्या महिन्यातील लसीकरण बदलापूरच्या दुबे रुग्णालयात केलं होतं. लसीकरण झाल्यानंतर काही दिवस तिच्या मांडीवर सूज होती. सूज उतरल्यानंतर पुढील पाच महिने अद्विकाला कोणताही त्रास झाला नाही. मात्र काही दिवसांपूर्वी ती सतत मांडी खाजवत असल्याचं बनसोडे दाम्पत्यांच्या लक्षात आलं.

मुलीला त्रास होत असल्याने त्यांनी तिला अंबरनाथच्या आशीर्वाद रुग्णालयात नेलं. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर मनोज कंदोई यांनी तिच्या मांडीचा एक्सरे केल्यानंतर मांडीत इंजेक्शनची सुई असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. त्यानंतर तिचं ऑपरेशन करून मांडीतील सुई काढण्यात आली.


Post a Comment

0 Comments