-->

Ads

चमत्कार! लग्नानंतर 4 वर्षे मुल नाही, आता एकाचवेळी 4 बाळांना दिला जन्म

 

Rajsthan 4 babies Born: किरण कंवर यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलांचे वडील मोहन सिंग हे शेतकरी आहेत. कुटुंबियांसोबतच त्यांच्या गावातही आनंदाचे वातावरण आहे.


Rajsthan 4 babies Born: देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो असं म्हणतात. त्यामुळे आयुष्यात कधी हताश आणि निराश होतो होऊन आशा सोडू नका. आयुष्यात अचानक असे काहीतरी घडते, ज्यामुळे आपला देवावरील विश्वास वाढतो. अशीच काहीशी सुखद घटना राजस्थानमधील एका महिलेसोबत घडली आहे. राजस्थानमधील टोंक येथील वजीरापुरा येथील रहिवासी असलेल्या किरण कंवरचे 4 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या ४ वर्षात तिला एकही मुल नव्हत. यासाठी त्यांचे वैद्यकीय प्रयत्नही सुरु होते. पण त्यांना यश मिळत नव्हते. मुल नाही म्हणून लोकांचे टोमणेही तिने याकाळात ऐकले. दरम्यान किरण कुंवर यांनी जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात चार मुलांना जन्म दिला आहे. त्यात दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. 

Post a Comment

0 Comments