सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी टोलनाक्यावर तोडफोड केली
नाशिक 23 जुलै : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांचा ताफा टोल व्यवस्थापनाने थांबवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. यानंतर या घटनेविरोधात संताप व्यक्त करत कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावर असलेल्या सिन्नर येथील टोलनाक्यावर तोडफोड केली. अमित ठाकरे यांना अर्धा तास ताटकळत ठेवल्याने मनसे पदाधिकाऱ्यांनी टोलनाकाच फोडला.
अमित ठाकरे आणि मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी 22 जुलै रोजी संध्याकाळी अहमदनगरहून सिन्नरकडे समृद्धी महामार्गाहून येत होते. यावेळी सिन्नर येथील समृद्धी महामार्गाच्या टोल नाक्यावर अमित ठाकरेंचा ताफा अडवण्यात आला. त्यांना आर्धा तास थांबवलं गेलं. ओळख सांगूनही संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
टोलनाका कर्मचाऱ्यांच्या अरेरावी आणि गैरवर्तनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. मध्यरात्री नाशिक शहराचे शहराध्यक्ष दिलीप दातीर तसंच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी टोलनाक्याची तोडफोड केली. तोडफोडीची ही घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली
0 Comments