-->

Ads

Vashithi River : दहावीत शिकणाऱ्या दोघांनी डोहात उडी मारली अन्.. तब्बल 24 तासांनंतर मिळाले मृतदेह

Vashithi River : शिरगाव जवळील नदीमध्ये बुडालेली दोन्ही मुलांचा तब्बल 24 तासांनंतर शोध लागला आहे.

10 जुलै : शिरगाव जवळील नदीमध्ये बुडालेली दोन्ही मुलांचा शोध लागला असून तब्बल 24 तासांच्या अथक शोधकार्यानंतर बेपत्ता मुलांचे मृतदेह वाशिष्ठीच्या नदीपात्रात सापडले आहेत. अतिक बेबल आणि अब्दुल लसने अशी या 2 मुलांची नावे असून दोघेही दहावीच्या वर्गात शिकत होते. काल सुट्टीचा दिवस असल्यामुळे हे दोघेही आपल्या मित्रांसोबत नदीवर आंघोळ करायला गेले होते. पावसाळा सुरू असल्याने नदीमध्ये पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले होते. काल घडलेल्या या घटनेनंतर शिरगाव परिसरात मोठी खळबळ उडाली होती. सध्या दोन्ही मृतदेह शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्ट मॉर्टम साठी आणले असून पुढील प्रक्रिया झाल्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येतील अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील शिरगाव येथील वशिष्ठी नदीतील कुंभार्ली स्मशानभूमी जवळ असलेल्या वझर या ठिकाणी 8 मुले पोहण्यासाठी गेली होती. तेथील डोहात चिपळूण मधील आतीक बेबल आणि अब्दुल कादिर लसने ही दोन मुले बुडाली तर इतर सहाजण बचावले आहेत. या घटनेची माहिती चिपळूणचे डीवायएसपी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळी पाहणी करून शोध कार्य सुरू केलं. रात्री उशिरा शोध कार्य थांबवण्यात आलं होतं. रात्री उशिरा पर्यंत 2 मुले सापडली नाहीत त्यामुळे एन डी आर एफ ची टीम पथकाला पाचारण करण्यात आलं आहे. आज तब्बल 24 तासांनंतर दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत.

आठ शाळकरी मुले शिरगाव येथील वझर याठिकाणी ते पोहण्यासाठी थांबले. यावेळी पावसाची एक मोठी सर आली आणि त्यातील सहा जण एका झोपडी खाली जाऊन थांबले तर आतिक बेबल व अब्दुल कादिर लसने यांनी डोहात उडी मारली. सदरचा डोह हा 30 ते 40 फूट खोल असून त्याच्या डोहात सापडल्यावर कोणीही वाचत नाही. त्यामुळे सदरची दोन मुले त्यात बुडाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ आणि पोलीस यांनी घटनास्थळी धाव घेतली तर चिपळूण डी वाय एस पी राजेंद्र राजमाने यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. पाण्याचा डोह हा खूप खोल आहे व पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने एनडीआरएफच्या पथक बोलावण्यात आलं होतं. काल रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम सुरू होती. कुंभार्ली ग्रामपंचायतमार्फत रात्री त्याठिकाणी विजेची व्यवस्था करून शोध मोहीम राबविण्यात आली.


Post a Comment

0 Comments