-->

Ads

Pune Crime: एटीएमवर दरोडा टाकण्याची तयारी, पोलीस पकडायला जाताच गोळीबार; पुणे हादरलं

 Pune Crime: एटीएमवर दरोडा टाकण्याची तयारी, पोलीस पकडायला जाताच गोळीबार; पुणे हादरलं


 पुणे : मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास कोंबिंग ऑपरेशन दरम्यान गुन्हे शाखेकडील युनिट ०३ चे अधिकारी आणि कर्मचारी, एसीपी वन हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये म्हाडा वसाहतीमध्ये कोंबिंग ऑपरेशन करत असताना रोझरी स्कूलच्या जवळ आठ ते दहा इसम संशयास्पद हालचाली करताना दिसून आले.

नमूद संशयित इसमांना ACP सुनील तांबे, PI बहिरट, PSI पवार आणि युनिट तीन कडील स्टाफ यांनी त्यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिशेने जात असताना एका संशयित आरोपीने पोलिसांच्या दिशेने पिस्तूल रोखले. त्यानंतर आरोपींनी पोलिसांवर गोळीबार केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींच्या दिशेने फायरींग केल. या दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये एका आरोपीने PC कट्टे यांच्या दिशेने धारदार शस्त्र फेकून मारल्याने ते जखमी झाले. त्यानंतर पाच आरोपींना पळून जात असताना पकडले.

त्यानंतर इतर चार ते पाच आरोपी यांच्यावर पोलिसांकडून फायरिंग केली असता ते आरोपी अंधारातून टेकडीच्या दिशेने पळून गेले. इतर आरोपींचा शोध चालू आहे. तसेच नमूद घटनेबाबत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून एक गावठी कट्टा त्यामध्ये जिवंत चार काडतुसे, दोन लोखंडी कोयते, कटावणी स्क्रू ड्रायव्हर आणि हातोडा असा मुद्देमाल त्यांच्याकडून ताब्यात घेण्यात आला आहे. ताब्यात घेतलेले आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरूद्ध विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तपासा दरम्यान ते एसबीआय बँकेच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याचे उघडकीस आले.


Post a Comment

0 Comments